कालानुरुप बातम्या

ताज्या बातम्या

air india plane skidded-एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये अपघात

  • 07 Aug 2020
  • (0)

एअर इंडियाच्या दुबई-कोझीकोड (IX-1344)) या विमानाला मोठा अपघात झाला आहे. या विमानात ६ क्रू मेबर्स आणि २ दोन पायलटसह १९१ प्रवासी होते. ही दुर्घटना पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. करिपूर विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरल्याने विमानाला मोठा अपघात झाला.

विमानत उतरत असताना ते धावपट्टीवरून घसरले आणि दरीत कोसळले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत, अशी माहिती डीजीसीएने दिलीय. मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिलीय. मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

अधिक वाचा

सोसाट्याच्या वाऱ्याने ठाण्यातील विजेचे खांब वाकले...

  • 07 Aug 2020
  • (0)

प्रतिनिधी- निखिल चव्हाण 
ठाणे -: सुसाटयाचा वाऱ्याने व अतिवृष्टीमुळे ठाणे येथील रतनबाई कंपाउंड ते लक्ष्मी रसिडेन्सी ते वागळेला जोडलेले विद्युततारांवर झाड कोसळल्याने मध्यरात्री १२.३०च्या दरम्यान रतनबाई कंपाउंड  येथे पोल पडले , संपूर्ण तारा खेचल्या गेल्या असून लक्ष्मी रसिडेन्सी येथे असलेल्या तारेचे पोल वाकले आहे , सदर घटनास्थळी ठाण्याचे माजी महापौर , लातूर जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे व माजी नगरसेवक घनश्याम कणसे यांनी जाऊन पाहणी करून दुर्घटना होऊ नये  यासाठी संजय मोरे यांनी संबधित विद्युत अधिकारी , कर्मचारी यांना त्वरित बोलावून  धोकादायक पोलचे काम करायचे आदेश दिले. सुदैवाने कोणतेही नुकसान व जिवीतहानी नाही झाली.

अधिक वाचा

उद्धव ठाकरे, अजितदादा पवार, राजेश टोपेंचे, धडाकेबाज पाऊल,; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू

  • 07 Aug 2020
  • (1)

प्रणया खोचरे 

‘कोरोना’ रूग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मुजोर खासगी रूग्णालयांना मोठा दणका देणारा आदेश राज्य सरकारने रात्री उशिरा जारी केला आहे. या आदेशामुळे राज्यभरातील सगळ्या रूग्णालयांवर सरकारी अंकुश प्रस्थापित झाला आहे.
   धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सगळ्या खासगी अथवा सामाजिक संस्थांच्या रूग्णालयांसाठी हा आदेश लागू राहणार आहे. ही रूग्णालये ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.खासगी रूग्णालये एकेका कोविड रूग्णांकडून आठ दिवसांसाठी ५ लाख, २५ लाख रुपये अशी अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळत होते. सरकारने आता या पिळवणुकीला चाप लावला आहे.
   सरकारी व महापालिकांच्या रूग्णालयांमधील जागा मोठ्या प्रमाणात व्यापल्या आहेत. त्यामुळे कोविड  रूग्णांना नाईलाजाने खासगी रूग्णालयांमध्ये भरती व्हावे लागत आहे. परंतु रूग्णांच्या या मजबुरीचा गैरफायदा खासगी रूग्णालये घेत होती. अक्षरशः लाखो रूपये उकळले जात होते. मुख्यमंत्री उद्ध व ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही बाब गांभिर्याने घेतली. दोन्ही मंत्र्यांच्या सुचनेनुसार हा आदेश आम्ही जारी केला असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी  दिली.
   या आदेशानुसार आम्ही खासगी रूग्णालयांसाठी अत्यावश्यक सेवा कायदाही (मेस्माही) लागू केला आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयांतील डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी संप करू शकत नाहीत. ही सेवा बजावणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.
   या आदेशात आपत्ती निवारण कायदाही लागू केला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश खासगी रूग्णालयांनी मानला नाही, तर त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होऊ शकतो, अशीही माहिती सुधाकर शिंदे यांनी दिली.

अधिक वाचा