नांदेड हिमायतनगर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भोकराच्या उपविभागीय अभियंत्यांच्या देखरेखीखाली  रुद्राणी कंपनीच्या ठेकेदाराकडून अर्धापूर - तामसा - हिमायतनगर - महागाव या राष्ट्रीय महमार्गाचे काम सुरु आहे. या कामात ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून, अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याची ओरड महामार्गावरील गावकऱ्यातून होत आहे. रस्त्याच्या मजबुतीकरण व पुलाच्या कामात मातीमिश्रित मुरूम व रेतीचा वापर केल्या जात असल्याने भविष्यात रस्ता टिकेल कि नाही अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. हि बाब लक्षात घेऊन तत्काळ ठेकेदाराच्या कंची उच्चस्तरीय चौकशी करून कामाचा दर्जा सुधार नयेत यावा अन्यथा काम होऊ देणार नाही असा इशारा टेम्भूर्णी, दिघी, घारापुर, हिमायतनगर येथील नागरिकांनी आजच्या कामाच्या खालावलेला दर्जा पाहून दूरधवनीवरून दिला आहे.

सध्या जवळगावपासून वाघी - दिघी - विरसनी - टेम्भूर्णी - घारापूर -हिमायतनगर मार्गे विदर्भातीळ महागावकडे जाणाऱ्या रस्त्याचे मुरूम व सिमेंटीकरण मजबुतीकरण व पुलाचे काम सुरु आहे. या कामामध्ये देखरेख करणाऱ्या ठेकदाराच्या मुनिमाने अभियंत्यास हाताशी धरून निकृष्ट काम करण्याचा सपाटा लावला आहे. आजघडीला दिघी, घारापुर भागात मातीमिश्रित मुरूम टाकून दबाई केली जात आहे. तर टेम्भूर्णी, वाघी परिसरात पुलाचे व रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. या कामामध्ये मातीमिश्रित नाल्याच्या रेतीचा वापर केला जात आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता व पूल टिकेल कि नाही याबाबत नागरीकातून साशंकता निर्माण केली जात आहे. सिमेंटीकरण व मजबुतीकरणाच्या कामात मातीमिश्रित रेतीचा वापर करुन काम अंदाजपत्रकास बगल दिला जात आहे. याचा प्रत्यय मजबुतीकरणानंतर झालेल्या सिमेंटीकरणावरून वाहने जाताच उडणाऱ्या चुलीवरून दिसून येत आहे.

हा प्रकार लक्षात आल्याने काही नागरिकांनी रस्त्याचे काम थांबविण्याची मागणी संबंधित काम करणाऱ्याकडे ठेकदारांच्या मुनीम व संबंधित अभियंत्याकडे केली. अभियंत्याने मुरूम व रेती वापरू नाक असे सांगूनही ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी आपला रेटा चालूच ठेऊन निकृष्ट काम उरकण्यावर भर दिला आहे. अश्या पद्धतीने अत्यन्त निकृष्ठ पद्धतीचे काम होत असताना याकडे अभियंता पारीख यांचंहि अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घारापुर, दिघी, टेम्भूर्णी येथिल गावकर्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना केला आहे. तसेच दि.२३ बुधवारी काही नागरिकांनी रस्त्याचे व पुलाचे काम थांबविले आणि संबंधितांस दूरधवनीवरून सूचना करून जोपर्यंत दर्जेदार रेती व मुरूम वापरली जात नाही तोपर्यंत काम करू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

मागील काळात रुद्राणीच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका रेल्वे कर्मचाऱ्याचा पुलाला धडकून जीव गमवावा लागला. तर तीन दिवसापूर्वी वटफळी जवळील गिट्टी क्रेशरच्या बेल्टमध्ये अडकून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. यास देखील ठेकेदार व त्या कामाची देखरेख करणाऱ्यां संबंधिताचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे मजुरांनी मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेतून समोर आले आहे. अश्या घटना घडत असताना देखील ठेकेदारच्या संबंधित यंत्रणेकडून पत्रकारानं त्या घटनास्थळी जाण्यास मज्जाव करून आपल्या निष्क्रियतेवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. याकडे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेबानी लक्ष देऊन रस्त्याच्या कामाचा दर्जाची चौकशी लावणे गरजेचे असल्याचे मत ग्रामीण भागातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.