जिंतूर (प्रतिनिधी):

आकाशवाणी परभणी केंद्र शालेय विद्यार्थ्यांचा विविध गुण दर्शनासाठी बाल मंडळ हा कार्यक्रम नेहमी आयोजित करते. या कार्यक्रमासाठी जिंतूर तालुक्यातील उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी येथील विद्यार्थ्यांची निवड झाली. नुकतेच या बाल मंडळ कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण पार पडले, व सदर कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्र येथून मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर,२०२० सायं.०६.:३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरीच्या खालील विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदविला.
कथा: वर्ग १ला-माही बाळू बुधवंत, कविता:वर्ग २ रा-
यशराज कृष्णा सुतार, कविता:वर्ग ३रा-प्रतिक जगन्नाथ बुधवंत व सार्थक पुंजाजी पालवे, नाट्यछटा:वर्ग ४ था-आरती पुंजाजी साखरे, प्रार्थना: वर्ग ५ वा-तेजस्विनी ज्ञानेश्वर चांदणे,
भाषण:वर्ग ६ वा- मयुरी सोपान कामिटे, ऑनलाईन शिक्षण यावर भाष्य वर्ग ७ वा-हरिहर रामप्रसाद घुगे सुत्रसंचलन- वर्ग ७वा गायत्री काशीनाथ घनवटे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, गटशिक्षणाधिकारी सुभाष आमले, केंद्रप्रमुख अण्णासाहेब जल्हारे, मुख्याध्यापक के सी घुगे, शिक्षक सुनंदा जाधव, अलका खिल्लारे, शिवगंगा जांभळे, रुपाली नागरगोजे, राजेश सातपुते, देवानंद सावंत यांचे लाभले.