<p>

 

      एकीकडे राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस आणि गोड चहा घ्यायचा अशी दुटप्पी भूमिका काही पक्षातील नेते करत असल्याची टीका भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. केंद्र सरकारने लागू कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी माध्यमाशी बोलताना खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टीवर जोरदार टीका केली.