आमदार विजय भांबळे यांच्याकडून न प कर्मचाऱ्यास मारहाण

"जिंतूर पोलीस ठाण्यात आमदारां विरोधात गुन्हा दाखल"

जिंतूर येथील नगर परिषदेच्या घरपट्टी व नळपट्टी वसुलीसाठी दबाव तंत्राचा वापर करत कर्मचाऱ्यास जिंतूर विधानसभा मतदार संघाचे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.विजय भांबळे यांनी घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवार दि.०५ जुलै २०१९ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी रात्री १०-३० वाजेपर्यत जिंतूर पोलिस स्थानकात गोंधळ सुरु होता रात्री उशिरा आ.भांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर नगर परिषदेचे कर्मचारी दत्तराव विश्वनाथ तळेकर यांच्या कडे कर विभागाचा कार्यभार आहे. शहरातील एकलव्य शाळेची नळपट्टी व घरपट्टी वसूलीसाठी आ.विजय भांबळे यांनी श्री.तळेकर यांना शुक्रवारी घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांच्यावर या कामासाठी दबाव टाकण्यात आला असे तळेकर यांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे. या कामासाठी आ.भांबळे यांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दत्तराव तळेकर यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी आमदार विजय भांबळे यांच्या विरोधात कलम ३५३,३३२,५०४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

 

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लीक करा 

https://www.youtube.com/watch?v=pMOD_GH0oCs

 

 

कमी कालावधी मध्ये  Youtube वर 19450 लोकांनी जागृत महाराष्टाला पसंती दिली आहे खालील लिंक ओपन करून तुम्ही पण Subscribe करा

प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क करा -९०२९४०२७९६ 

Subscribe करा 

 

माध्यमांचा हवा तसा वापर खरच होतोय का ?

खालील लिंक पहा 

आम्हांला साथ हवी आहे