मोदी सरकारने लादलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून सरकारने हा निर्णय तातडीने रद्द करावा या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बुधवार १६ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.