शिवसेना शाखा क्र. 49 तसेच नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळु शिल्पकार कुणाल उमेश आळवे व त्यांच्या टीमने कोरोना योद्धांना सलामी देण्यासाठी व माझे कुटुंब माझी जबाबदारी या थीम वर जनजागृती करण्यासाठी मढ समुद्रकिनारी २० बाय ३० फुटाचे वाळुशिल्प तयार केले आहे. तरी पर्यटकांनी व नागरीकांनी सदर शिल्प एकदा अवश्य बघावे व कोरोना योद्धांना व या वाळू शिल्पकारांना प्रोत्साहित करावे असे आवाहन समाजसेवक संजय सुतार, अंकित सुतार, शाखाप्रमुख संदेश घरत यांनी केले आहे. सदर शिल्प बघण्याकरिता सर्व महिला-पुरुष, उपशाखापमुख, गटपमुख, युवा सैनिक व समस्त शिवसैनिक उपस्थित होते.