कोरोना. का आलास तू सर्वांचं आयुष्य बरबाद करतो आहेस माझंही तसच केलंस ना माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आणि हृदयाच्या भाग असलेली व्यक्ती फक्त आणि फक्त तुझ्या मुळेच माझ्या इतक्या लांब गेली की त्या व्यक्तीचा सहवास देखील आता उभ्या आयुष्यात लाभणार नाही, काय दोष होता माझ्या वडिलांचा, तुझं काय वाकड केलं होतं त्यांनी, त्यांनीच नव्हे तर इतर लोक जे तुझ्या मुळे मृत्यू च्या दाढेत अनाहूत पणे ओढले जात आहेत. कित्येक लोकांनी तुझ्या भितीमुळे च स्वतःचे प्राण सोडले माझे वडील देखील त्यातलेच एक. हॉस्पिटलमध्ये जाताना अस वाटलं देखील नव्हतं की ते पुन्हा न येण्यासाठी जाणार आहे ते कायमचे. सर्व काही विचारा पलीकडे होतं. वडिलांना फक्त थोडासा ताप जाणवत होता त्यातून ते पूर्णपणे बरे सुद्धा झाले होते, काही दिवसांनी पुन्हा अशक्तपणा जाणवायला लागला त्यामुळे प्रायव्हेट डॉक्टर केला पण त्यांनी सुद्धा हात वर करून वरच्यावर चेक करून ऑक्सिजन ची कमतरता असल्याने बीएमसी मध्ये जाऊन चेक करा आणि कोविड चा रिपोर्ट काढा असे सांगितले, त्यामुळे इतके तिकडे न जाता सरळ जवळचं बीएमसी हॉस्पिटल बहिणीने गाठले आणि तिकडे त्यांना ऍडमिट केलं सुद्धा. रिपोर्ट यायच्या अगोदरचे दिवस एकदम सुरळीत चालले होते, वडिलांचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण,  चहा, पाणी, संध्याकाळ नाश्ता, जेवण अगदी क्रमवारीत चाललं होतं रोज फोन वर बोलणं होऊन बहिणीच्या नियमित हॉस्पिटलमध्ये चकरा सुद्धा व्हायच्या त्यांना काय हवंय नको याकडे ती लक्ष देऊन असायची, असे 3,4 दिवस होत गेले रविवार चा दिवस उजाडला आणि जी भीती मनात वाटत होती शेवटी ती खरी ठरली आणि वडिलांचा रिपोर्ट पॉसिटीव्ह निघाला. रिपोर्ट आल्या नंतर सर्वात मोठा धीर धरला तो आईने फक्त वडिलांपर्यत ही गोष्ट पोहचू नये याची सर्वांनी पुरेपूर काळजी घेतली होती. ज्या दिवशी रिपोर्ट पॉसिटीव्ह आला त्याच दिवशी बीएमसी वाले घरात संपूर्ण घर सॅनिटाइज करायला आले आणि आम्हाला सर्वाना त्याच दिवशी क्वारंटाईन केले गेले असल्याने हॉस्पिटलमध्ये वडिलांच्या जवळ कोणालाही त्या दिवशी जाता आले नाही पण तिकडे बहिणीच्या सोबत हॉस्पिटलमध्ये जे दादा, ताई असायचे त्यांच्या मार्फत वडिलांची विचारपूस नेहमी व्हायची त्यामुळे रविवार च्या दिवशी सुद्धा त्यांच्या मार्फतच वडिलांची विचारपूस झाली आणि ते अगदी बरे असल्याचे सांगितले आणि वडिलांनी सुद्धा मी अगदी ठीक आहे असं आम्हाला त्यांना सांगायला सांगितलं. 
  सोमवार चा दिवस उजाडला बरोबर सकाळी 9 वाजता वडिलांना फोन केला तेव्हा सुद्धा ते नीट बोलले नाश्ता करायचा बाकी आहे फक्त येईल थोड्या वेळात इतकच बोलून त्यांचा फोन बंद पडला तो कायमचाच नंतर खूप प्रयत्न केला त्यांना फोन लावायचा पण फोन बंदच होता. त्यामुळे घरातले सगळे चिंतेत होते. बहिणीने पुन्हा तितके असणाऱ्या ताईला फोन लावला आणि विचारायला सांगितलं की वडिलांना जरा पाहून ये तर ती बघायला डॉक्टरांना विचारायला जाणार त्याच वेळी डॉक्टरांनी सांगितले की तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बोलवून घ्या, ती स्वतःच होताच काम टाकून रिक्षा पकडून जात होती तेव्हा पुन्हा हॉस्पिटलमधून फोन आला की तुमचे वडील सिरीयस आहेत लवकर पोहचा, ती हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या अगोदरच होत्याचं नव्हतं झालं, वडिलांनी त्या अगोदरच श्वास सोडला होता तो कायमचा. स्वप्नातही आमच्या पैकी कोणी विचार केला नव्हता की अस काही होईल डॉक्टरांना विचारल्या नंतर ते सुद्धा बोलले की सकाळपासून ते ठीक होते नीट बोलत होते सर्वांशी फक्त आम्ही रिपोर्ट पॉसिटीव्ह सांगितला इतकंच, हे डॉक्टर लोक इतकंच कस बोलू शकतात जी गोष्ट आम्ही त्यांच्या पासून लपवून ठेवली ती कसलाही विचार न करताच त्यांनी कशी काय सांगितली असावी, या रिपोर्ट चाच धक्का वडिलांना सहन झाला नाही आणि त्याच क्षणी त्यांच्या हृदयाचे ठोके बंद पडले. बहीण हॉस्पिटलमध्ये पोहोचली तिला ती वार्ता काळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली तरी सुद्धा कशी बशी हिम्मत करून तिने स्वतःला पूर्णपणे सावरायचा प्रयत्न केला. सोसायटी मधील दोन व्यक्तिरिक्त कोणीच आले नव्हते. 
   इकडे आम्ही बहिणीला सारखा फोन लावतोय तरी सुद्धा ती फोन उचलत नव्हती त्यामुळे अजून भीती मनात दाटत होती आणि धडकी भरून येत होती, शेवटी बहिणीच कॉल आला वडिलांच्या मृत्यू ची माहिती मिळाली. रडू तरी कशी आईला सवरायच होत तरी धीर धरून आईला सांगितलं ती तिकडेच खाली बसली धक्का लागल्यागत. घराजवळ हळू हळू माणसं जमायला लागली तेव्हा बाजूच्या काकांनी सर्वाना पुन्हा आपल्याला घरी पाठवलं. त्यावेळी घरात फक्त मी भाऊ आणि आई इतकेच आम्ही होतो आम्हाला सावरायला फक्त आम्हीच होतो. वडिलांना शेवटचं बघायला मिळणार हे कळल्यावर आम्ही हॉस्पिटल गाठले.
   घराच्या बाहेर पडल्यानंतर सर्व जण फक्त खिडकी तुन, दरवाजा तुन लांबून पाहत होते बस्स तेव्हा कुठेतरी काळजात चर्रर्रर्र झालं की अशा वेळी मोजकीच माणसं सोडली तर धीर द्यायला कोणीच नव्हते. हॉस्पिटल गाठलं थोड्या वेळाने प्लास्टिक च्या पिशवीत दोन मृतदेह बाहेर आणले गेले ऍम्ब्युलन्स ने त्यांना स्मशानभूमीत नेलं सर्वांचे डोळे फक्त वडील केव्हा येतील केव्हा त्यांना शेवटचं पाहता येईल याकडे लागलं होतं अखेर तो क्षण आला आपल्या घरातल्या व्यक्तीला सुद्धा अशाच प्लास्टिक च्या पिशवी मध्ये नेलं जाइल अशी पुसटशी कल्पना देखील केली गेली नव्हती तीच वेळ आली आणि वडिलांना शेवटचं दाखवण्यात आलं सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि सगळे आम्ही रडायला लागलो. वडिलांना सुद्धा स्मशानभूमीत नेण्यात आलं भावा बरोबर मामा आणि चुलत भाऊ फक्त चौघे जाऊन त्यांच्यावर रीतसर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
   इकडे आम्ही घरी आलो तेव्हा सुद्धा तीच परिस्थिती सर्वजण फक्त लांबून आमच्या कडे पाहत होते कोणीच पुढे यायला तयार होईना, बहुदा ती कोरोनाची भीती सर्वांच्या मनात घर करून बसली होती म्हणून ईच्छा असुन सुद्धा कोणी पुढे आला नसावं अस सुद्धा असेलही, माझ्या दुष्मणासोबत सुदधा माझ्यावर जशी वाईट वेळ आली होती अशी कधीच येऊ नये असं मला तरी वाटतं पण अशा वेळी माणसं ओळखायला सुद्धा तितकीच मिळतात ना हे मात्र मी अचूक जाणलं. त्या एका विषाणूने आपली भीती सामन्यात इतकी पसरवली आहे की साधी कोणाला शिंक आली थोडा ताप आला तरी ह्याला कोरोना झाला आहे आपण ह्याच्या पासून लांब राहुयात त्यातच आपलं भलं आहे असं सर्वांची विचारसरणी झाली आहे. माणूस आपल्या जीवाला इतका घाबरला आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीचा जरासुद्धा त्रास झाला तरी माझ्या सोबत इतकं काहीतरी विपरीत घडेल अस त्याला वाटतं. इतकी भयानक परिस्थिती आजची आहे.
   पण मुळात यात एक मुद्दा माझ्या मनात सारखा येतोय की डॉक्टर पेशंट चा रिपोर्ट का पेशंट ला सांगतात फॅमिली पर्यंत ठीक आहे ते चालून जात पण आजची परिस्थिती इतकी गंभीर आहे की लोकांना साधा आपला अहवाल पॉसिटीव्ह आला आहे असं कळलं तरी त्या भीतीपोटी त्यांचे प्राण जात आहेत हे ही तितकंच खरं आहे त्याचप्रमाणे कित्येक अशी हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी कोविड पॉसिटीव्ह रोग्यांना आणि ऑक्सिजन ची कमतरता असलेल्या लोकांना एकत्रित ठेवण्यात आले आहे हे कुठे ना कुठेतरी बंद होणे गरजेचे आहे. प्रत्येक पेशंट हा वेगवेगळ्या आजारातून जात असतो ज्या व्यक्तीला हृदयाचा , पायाचा आजार असेल त्या पेशंट ला पण एकत्रित ठेवलं जातंय. आणि काही कसलाच आजार न होऊन पण त्यांना पॉसिटीव्ह रिपोर्ट दिला जातोय अस कुठेना कुठे तरी वाटायला लागलंय. आज त्या जागी माझे वडील होते उद्या त्या जागी मी,तुम्ही तुमच्या परिवारातील लोक किंवा इतर कोणीही असू शकतो प्रयत्न इतकाच की जी वेळ माझ्या वडिलांवर आली होती ती इतर कोणावर ही येऊ नये, आणि हो नका तुटक सारखे वागू ज्या परिवारावर अशी वेळ आली आहे ना त्यांच्या सोबत जी लोक कोरोना पेशंट बरे झाले की टाळ्या वाजवत कौतुक करतात आरत्या ओवाळतात तीच लोक रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्यावर स्वतःची घरे, दरवाजा खिडक्या बंद करून घेतात जेणेकरून आपल्याला या सर्वाचा त्रास नको पण हीच वेळ असते हो एखाद्याला हिंमत द्यायची धीर द्यायची काळजी नको करू आम्ही आहोत तुझ्या सोबत
इतकी गोष्ट त्यांना अपेक्षित असते फक्त आणि त्यांना पण तेच हवं असतो हो. अस म्हणतात की लोकांच्या सुखात सर्वजण नेहमी सामील होतात पण दुःखात सुद्धा तितकंच सामील व्हा, कारण आज जी वेळ आपल्यावर आली आहे ती उद्या तुमच्यावर सुद्धा येऊ शकते त्यामुळे माणुसकी जपा. आज अशी कित्येक कुटुंब आहेत त्यामध्ये कोणी ना कोणी आपला नवरा, कोणी बाप, कोणी मुलगा-मुलगी गमावले असणार या कोरोनामुळे प्रत्येक मिनिटाला कोणाचे ना कोणाचे प्राण जात आहेत या कोरोनामुळे पण हा रोग असा आहे की याचा अंत कधीच नसेल किंबहु कमी होईल ही पण एकदा का एखादा व्यक्ती गरजेला उपयोगी नाही पडला ना तर पुन्हा त्या व्यक्तीला सुद्धा विचारणारा कोणी नसेल. माणसाने माणसाशी माणुसकी ने वागावे हे फक्त ऐकायला चांगल वाटत पण इकडे तर माणुसकी लोप पावली चालली असल्याचे दिसून येतेय.


 *****वरील गोष्ट कोणाला दुखवण्यासाठी मांडली नसून सद्यपरिस्थिती ची जाणीव करून देण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना योग्य अशी मदत मिळावी यासाठी माझा हा प्रयत्न*****
   प्रणय खोचरे मालाड