; कोविड 19 आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज पहाटे ठाणे जिल्ह्यात  दाखल झाला आहे. येत्या 16 जानेवारीला लसीकरणास प्रारंभ होणार आहे. विशेष वाहनाने ही लस ठाण्यात आणण्यात आली असून उपसंचालक कार्यालय मुंबई मंडळ ठाणे येथे  हा साठा पोहोचविण्यात आला आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून ठाणे मंडळासाठी सुमारे 1 लाख 3 हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यापैकी 74 हजार डोस ठाणे जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणाहून ठाणे जिल्ह्यातील 29 निर्देशित  केंद्रांमध्ये हि लस पोहोचविण्यात येणार असल्याचे उपसंचालक गौरी राठोड यांनी सांगितले आहे. तसेच हि लस सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. नागरिकांनी या लस बाबत कोणतीही भीती मनात ठेऊ नये हि लस अत्यंत उपायकारक असुन याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाही असे डॉ. गौरी राठोड यांनी सांगितले आहे.