रायगड - अरविंद गुरव

कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता व रुग्णांस काही वेळेस रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही व बरे होऊन येणाऱ्या रुग्णांस खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते ही गरज लक्षात येताच कोणतीही आपत्ती असो यावेळी सदैव मदतीचा हात पुढे करणारे समाजसेवक राजू पिचिका यांनी पेण तहसील कार्यालयास एक रुग्णवाहिका भेट दिली.
पेण शहरात सध्या कोरोना संसर्गाचे आकडे वाढत आहेत,एकाच वेळी अनेक रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत,शासन आपल्या परीने कोरोना युद्धात आपली भूमिका सुद्धा योग्य बजावत आहे मात्र सोशियल डिस्टंसिंगचा अभाव आणि पेणच्या बाजारातील वाढती गर्दी यामुळे कोरोना सध्या पेण शहरात थैमान घालत आहे,पॉझिटिव्ह रुग्णास 108 रुग्णवाहिका सेवा देत असते मात्र बरे होऊन परत घरी येणाऱ्या रुग्णांस रुग्णवाहिका मिळणे कठीण जाते हीच गरज ओळखून समाजसेवक राजू पिचीका यांनी आपल्या स्वखर्चाने एक अद्यावत 24 तास सेवा असलेली रुग्णवाहिका पेणकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. शहरात नवीन रुग्णवाहिका दाखल झाल्याने covid-19 रुग्ण  वाहतुकीचा मोठा दिलासा मिळणार आहे.
नुकताच पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांच्या मार्फत या रुग्णसेवेचा शुभारंभ पेण तहसीलच्या प्रांगणात करण्यात आला.