साईन कोळीवाडा परिसरातील लोकांना वारंवार घर तोडण्याचा नोटीसा बजावल्या जात आहे, कोळीवाडा अंतर्गत सीमाकंन होवुन सुद्धा नोटीसा बजावण्यात आल्यामुळे येथील निवासी हैराण झाले आहेत, याची दखल घेऊन मुंबई मच्छिमार काँग्रेसचे अध्यक्ष धनाजी कोळी यांनी तिथल्या स्थानिक लोकांना घेउन राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांच्या समोर त्यांचा समस्या मांडल्या असून सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली. यावेळी उत्तर मुंबईचे मच्छिमार काँग्रेस अध्यक्ष डिगंबर वैती, भुषन केणी, अरुण केणी, जया केणी, राजेश कोळी आदी उपस्थित होते.