रायगड - अरविंद गुरव

पेण तालुक्यात ७० टक्के प्रदुषण ज्या कारखान्यामुळे होत अशा जेएसडब्लू या पोलाद निर्मिती करणाऱ्या कारखान्यातुन आज सकाळी धुराचे लोट वातावरणात पसरल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. या वेळी सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवांनी अक्षरशः थैमान घातले होते. 

पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीतुन अचानक निघत असलेल्या धुरांच्या लोटांमुळे पेण व अलिबाग तालुक्यात घबराट पसरली होती. समाज माध्यमांवर कंपनीत एखादी दुर्घटना घडल्याची चर्चा होत होती. त्याचप्रमाणे केमिकल गळती व शॉर्टसर्किटची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात येत होती. हा धुर बाराही महीने निघत असलेल्या प्रमाणात जास्त असल्याने नागरिक धास्तावले होते. हे प्रदूषण रूपी धुर खरच नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक आहे का ? हे प्रशासन नक्कीच शोधेल अशी आशा व्यक्त होत आहे. या संदर्भातील घटनेचे व्हिडिओ तसेच फोटो संपुर्ण जिल्हाभर समाज माध्यमावर फिरत होते. त्यामुळे  पेण व अलिबाग तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते. 

या संदर्भात पेण तहसीलदार अरुणा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर घटनेला दुजोरा दिला. मात्र कंपनीत ब्रेक डाऊन झाल्यामुळे धूर पसरल्याचे सांगीतले. 

 

यावर जेएसडब्लू कंपनीचा खुलासा

कंपनीत कोणतीही दुर्घटना नाही; जेएसडब्ल्यू कंपनीचा खुलासा

कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही, बुधवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान जेएसडब्ल्यू डोलवी येथील प्लांट मध्ये कंपनीचे कोक ओव्हन हे युनिट आहे. त्या युनिटमध्ये इलेक्ट्रिक पावर ट्रिप झाली. त्या दरम्यान सदरहू प्लांट शटडाऊन झाला आणि कोक बनण्याची प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे कोकचे धूर चिमणीतून 10 ते 15 मिनिटे बाहेर पडला. हा विषारी वायू नाही. तसेच प्लांट पूर्ववत सुरु झाल्याची माहिती जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली.