<p>  

 

ANCHOR : ठाण्यातील वर्तकनगर येथील शिवाईनगर परिसरात असलेल्या वारीमाता ज्वेलर्सवर रविवारी पहाटे २ ते २-३० वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. शिवाईनगरमध्ये वारीमाता गोल्ड ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. याच दुकानाच्या बाजूला असलेल्या गळ्यात फळविक्रीचा धंदा गेल्या दोन महिन्यापासून सुरु होता. सदर फळे विकण्यासाठी महिना २८ हजार रुपये भाड्याने गाळा एका परराज्यातील इसमाने घेतला. दुकान भाड्याने घेतल्यानंतर या दुकानात दोन महिने फळे विक्रीचा व्यवसाय केवळ नावापुरता सुरु केला आणि संधी मिळताच रविवारी पहाटे २ ते २-३० वाजण्याच्या सुमारास फळाचे दुकान आणि ज्वेलर्सच्या दुकानात असलेली सामाईक भिंत फोडून आरोपीने दुकानात प्रवेश केला. दुकानात प्रवेश केलेल्या आरोपीने दुकानातील तिजोरीची गॅसकटरने कापल्याचे आणि तिजोरीतील  सोने अडीच किलो सोने आणि  ३० किलो चांदी घेऊन पोबारा केला आहे. वारीमाता गोल्ड ज्वेलर्सचा दरोडा हा पूर्वनियोजित दरोडा होता हे स्पष्ट होत आहे. घटनास्थळी वर्तकनगर पोलिसांनी पंचनामा करून परिस्थितीजन्य पुरावे घेतले आहेत. आता वर्तकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून मिळालेल्या CCTV  च्या मार्फत पोलीस आरोपीचा शोध  घेत आहेत.  तर या प्रकरणी पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन आरोपीस कठोर कारवाई करावी अशी मागणी दुकानदार यांनी केली आहे . 
BYTE : मुकेश चौधरी - ज्वेलर्स दुकान मालक