ठाणे शहरात नागरिकांसाठी महापालिकेची सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध आहेत. या सार्वजनिक प्रसाधनगृहांची अस्वच्छता, दुर्गंधी आणि अपुऱ्या सुविधांमुळे महिलांना त्याचा वापर करणे अवघड असते.  दाट लोकवस्तीत राहाणाऱ्या महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांत सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर करणे अत्यंत अवघड होत असते. या गोष्टीचा विचार करून ठाण्यातील ‘म्युज फाउंडेशन’ आणि ठाणे महापालिका यांनी एकत्रित येऊन शहरातील लोकमान्य नगर परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहात मासिक पाळीची खोली सुरू केली आहे. सॅनिटरी पॅडचा निचरा होण्यासाठी कचरापेटी, आरसा, पाण्याची सुविधा, बाथरूम अशा सुसज्ज खोलीची रचना लोकवस्तीतील महिलांच्या गरजा ओळखून करण्यात आली आहे.
ही खोली एका खासगी कंपनीने बनविली आहे. सध्या ही खोली प्रायोगिक तत्त्वावर एका परिसरात सुरू करण्यात आली आहे.

 

BYTE - महिला १,२ / नैना ससाणे ( सह आयुक्त ( ठाणे महानगरपालिका ) / मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका