अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय व  एन.एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक व शनीमंडळ गावाचे सुपुत्र डी डी राजपूत यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्याअनुषंगाने सोमवार दि 14 सप्टेंबर रोजी अमळनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील व अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.