(भारतीय न्यायव्यवस्थेचा,न्यायालयाचा,कायदेसंहितेचा आणि त्यासंदर्भातील सर्व अधिकार्यांचा मी अत्यंत आदर करते.फक्त एक सामान्य माणूस म्हणून मनात आलेले लेखणीतून उतरवत आहे...कोणाचाही अवमान/अपमान करण्याचा यत्किंचितही हेतू माझ्या मनात नाही..तेव्हा कोणीही वैयक्तिकरित्या घेऊ नये ही नम्र विनंती)

मी एक भारतीय आहे.सत्यप्रिय व्यक्ती आहे.भारतीय कायदा आणि सुव्यवस्थेचा खूप आदर करते आणि विश्वासही ठेवते.खूप वाक्य वाचली आहेत.'शेवटी विजय सत्याचा असतो.' 'शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकही निरपराध अडकता कामा नये.' वाचून किती छान वाटतं...सद्ध्याच्या परिस्थितीचा शांतपणे विचार केला तर मनात येतं..खरंच असं असतं का??घडतं का???

"न्यायालय"..... 'न्यायाचे आलय'...जिथे शंभर टक्के न्याय मिळतो.कारण इथे संपूर्ण केसची सर्व बाजूंनी योग्य ती छाननी केली जाते.इथे प्रत्येक सज्ञानाला अधिकार असतो..न्यायासाठी लढण्याचा...फक्त योग्य न्याय "कधी" मिळेल हे सांगणे कठीण...मिळणार नक्की..पण कधी त्याचे उत्तर कोणाकडेही नाही...

तसं कोर्ट केसेसविषयी बरंच ऐकलंय आणि अनुभवलंयही..अगदी जवळून....स्वतःला न्याय मिळवण्यासाठी,क्वचितप्रसंगी जास्त फायदा घेण्यासाठी सरळ चाललेले काम खंडीत करण्याचा एक मार्ग.. "कोर्टकेस"....आणि कधी आपला हक्क/अधिकार असूनही आणि विशेष म्हणजे आपण संपूर्ण बरोबर असूनही आपल्या हक्कावर/न्यायावर पाणी सोडायला लागण्याचे मुख्य कारण..."त्यासाठी लढावी लागणारी कोर्टकेस"....दोन्ही प्रसंगांचा संबंध "कोर्टकेस"शी आहे...खरं तर विचिञ आहे पण हे सत्य आहे...

एकदा का ह्या कोर्टकेसला सुरुवात झाली...की ती उभी रहाण्यासाठी एक वर्षतर कुठेही नाही गेले...त्यानंतर पडणार्या तारखा..सर्व पक्षांची उपस्थिती...सर्वांचा विचार करावा लागतो..त्यामुळे कडक पाऊले उचलता येत नाहीत....नंतर hearing/arguments...यामधे वेळ किती जाईल ते माहीत नाही..नंतर निकाल...आणि पुढील अपिलासाठी असलेली provision....सुप्रिम कोर्टापर्यंत विचार केला तर ज्याने केस टाकली आहे तो जिवंत असेपर्यंत निकाल लागून त्याला न्याय मिळेल/ना मिळेल..हे फक्त त्याच्या नशीबावर आहे...सदर सर्व गोष्टींचा विचार केला तर सामान्य नोकरी/धंदा करणार्या व्यक्तींना इतका वेळच नसतो आणि मोठी काम करणार्यांना इतका वेळ थांबून स्वतःची रोजी—रोटी थांबवायची नसते...बरं आणि आपला कायदा इतका सर्वांचा विचार करतो की समोर अपराधी असूनही क्वचितप्रसंगी आपण काहीही करु शकत नाही...ह्या सर्व गोष्टींची,निकालासाठी होणार्या विलंबाबाबत कधी विचारणा केली तर असे कळते..काही अडचणींमुळे इतक्या प्रचंड केसेस pending आहेत..ज्याला पर्याय नाही....

खूप चिडचिड होते हे सर्व बघून,ऐकून...शांत डोक्याने आणि मनाने विचार केला तर असं वाटतं...आपण सत्याने वागून खरंच सद्ध्याच्या ह्या जगात सत्याचा विजय होतो का?सत्याला न्याय मिळतो का??कारण सत्य सिद्ध होण्यासाठी आधारस्तंभ असलेल्या कायद्यात.."Time Period" ची provision केलेली नाही...जी सद्ध्याच्या काळाची प्रमुख गरज आहे...

मी वर उल्लेखलेले खूप कटू असेल पण सत्य आहे..अनुभवलंय...एक सामान्य माणूस म्हणून सांगेन...कायदा त्याच्या जागी बरोबर असेलही पण मग दोष कुठंयं????सामान्य माणसाला,सच्चाईला न्याय मिळायला तर हवाच पण तो योग्य आणि माफक वेळेतच मिळायला हवा...तर त्याला अर्थ आहे....आणि जर मिळत नसेल तर खरंच त्यामधे आमुलाग्र बदल होण्याची आवश्यक्ता/गरज आहे...तर आणि तरच  सामान्य माणसाच्या मनातली कायद्याची "आधारस्तंभाची" जागा अढळ राहील....

धनश्री सुरेश रुईकर