SSC Result 2020: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५
विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गेल्यावर्षी निकाल सटकून आपटला होता. २००६ सालानंतरचा तो सर्वाधिक कमी निकाल होता. नवा अभ्यासक्रम हे त्यामागचं कारण मानलं जात होतं. गेल्या दोन-तीन वर्षात अंतर्गत मूल्यमापनही झालं नव्हतं. यंदा मात्र निकालाने उसळी घेतली. गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

दृष्टिक्षेपात निकाल -

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १७ लाख ६५ हजार ८९८
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी - १७ लाख ९ हजार २६४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - १५ लाख १ हजार १०५
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी - ९५.३० टक्के

विभागनिहाय टक्केवारी
कोकण - ९८.७७ टक्के
पुणे- ९७.३४ टक्के
कोल्हापूर -९७.६४ टक्के
अमरावती - ९५.१४ टक्के
नागपूर - ९३.८४ टक्के
मुंबई- ९६.७२ टक्के
लातूर - ९३.०७टक्के

 

   पुढीलपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर निकाल पाहू शकाल -

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com