अरविंद गुरव 
सुरुवातीला संपूर्ण रायगड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते,मात्र पेण तालुका पूर्णपणे सुरक्षित होता. परंतु मागील 15 दिवसातील आढावा घेतला असता पेण मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासात पेणमध्ये 9 कोरोना पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळले असून 2 शहरी भागात तर 7 ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजमितीला पेणमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 38 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे हा वाढता आकडा भविष्यात पेणकरांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेऊन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पेणमध्ये कडकडीत बंद कशाप्रकारे पाळता येईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत असे काही सुज्ञ पेणकर नागरिकांची मागणी आहे.