आधुनिक द्रोणाचार्य बनूण ,विद्यार्थी हिताची परवा न करता ,आपल्या पदाचा दुरूपयोग करून सप्टेंबर मध्ये विद्यापीठांच्या मुलांना परीक्षा सक्तीच्या करून आपण कलम कसाई असल्याचे सिद्ध केलेल्या,युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांची हकालपट्टीची मागणी विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजीरी धूरी यांना मेल द्वारे व ट्विटर द्वारे केले असता प्रधानमंत्र्यांनी प्रतीसाद न दिल्याने "प्रधानमंत्री विद्यार्थी बचाव , पटवर्धन  हटाव" अशी ट्विटर मोहीम सुरू केल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्षा धूरी यांनी दिली आहे .
बीयर बारशी विद्यार्थ्यांची तूलना करणाऱ्यां पटवर्धन यांना मोदी सरकार कसे काय पदावर ठेवू शकते ? याचा संताप धूरी यांनी व्यक्त केला आणि विद्यार्थी भारती हा लढा अधिक तीव्र करेल व अभिनव आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.

गेले अनेक दिवस विद्यार्थी भारती संघटना वेगवेगळ्या समाजमाध्यमातून  अंतिम सत्राच्या परीक्षा सरसकट रद्द व्हाव्यात  व सर्व विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा ,तसेच एटिकेटी व बॅकलॉग च्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास केलं जावं, विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप मिळावी, ऑनलाईन सत्र बंद व्हावेत अश्या काही मागण्या घेऊन  केंद्र सरकारला , युजीसीला , केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र पाठवत आहे. परंतु त्यावर काहीच प्रतिक्रिया येत नसल्याने.  विद्यार्थी भारती च्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी या 16 जुलै ला उपोषणाला बसल्या असताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व सुप्रियाताई सुळे यांच्या आश्वासनाने उपोषणाला स्थगिती दिली असली तरीही 1 ऑगस्ट पर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे मंजिरी धुरी यांनी सांगितले. 
 तसेच तो पर्यंत देशातील त्या सर्वच विद्यार्थ्यांना ज्यांना परीक्षा रद्द व्हाव्यात असे वाटत असेल त्यानी या लढ्यात सामील होऊन मोठ्या प्रमाणात सरकारला ट्विटर भेजो मोहिमेत सामील होण्याचे आव्हान राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी सांगितल्याचे पत्रक राष्ट्रीय उपाध्यक्ष अर्जुन बनसोडे यांनी काढले.