नेर येथे रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे एका ट्रकचे पाटे तुटल्याने सुरत- नागपुर महामार्गावर मध्यभागीच ट्रक खराब झाला. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. 
         महामार्ग असलेल्या रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्यांचे प्रमाण जास्त वाडले आहे. यामुळे वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत असतात. या खड्ड्यांमुळे जास्त ट्रॅफिक होत असल्याने वाहनचालक व ग्रामस्थ त्रस्त आहेत. रात्रीच्या वेळेस वाहन चालकांना अपघात होण्याची शक्यता जास्त जाणवते. 
        येथील पांझरा नदी वरील पुलाचे पणं बरेच प्रमाणत कठडे तुटलेले आहेत व पुलाच्या मध्यभागी बरेच प्रमाणात खड्यांचे प्रमाण वाडले आहेत. नेर फाट्यावर गावाकडे रस्त्या लागत खड्यांचे जास्त प्रमाण असल्याने ग्रामस्थांना अडचणी येत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी नेर ग्रामस्थांनी केली आहे.