प्रतिनिधी - निखिल चव्हाण 

ठाणे - कोरोना संकटात जीवावर उदार होऊन रस्त्यावर उतरून वृत्तसंकलन करणाऱ्या तसेच कोरोना बाधित होऊन त्यावर मात करणाऱ्या ठाण्यातील पत्रकार आणि डॉक्टरांचा "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान करण्यात आला. ठाण्यातील कोपरी येथे न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आयोजक तथा भाजपचे स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या हस्ते पत्रकार आणि डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.  

        गेली 10 महिने कोरोना सारख्या आजाराने सर्वांना त्रस्त केले आहे. यामध्ये रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकार तसेच सामान्य नागरिककासाठी अविरतपणे कोपरीमधील डॉक्टरांना सत्कार करण्यात आला असून प्रमानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात ठाण्यातील पत्रकार तसेच डॉक्टरांचा सत्कर करण्यात आले. पत्रकार संजय पितळे,आनंद कांबळे,जितेंद्र कालेकर,प्रमोद खरात,कपिल राऊत,गणेश थोरात, छायाचित्रकार गजानन हरीमकर, दीपक कुरकुंडे, मनीष पोळेकर, संदीप खर्डीकर यांचा सत्कर करण्यात आला. तसेच कोरोना काळात रुग्णांना उपचार करून मानसिक आधार देणाऱ्या डॉक्टरांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

       कोरोनाची भीती असताना देखील अनेक पत्रकारांनी आणि डॉक्टरांनी आपले कर्तव्य बजावले आहे. समाजाचे काहीतरी देणे आपण लागतो तसेच कौतुकाची थाप मिळवली हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक भरत चव्हाण यांनी सांगितले.