रत्नदीप शेजावळे
जिंतूर( दि-३१/०७)

जिल्ह्यात गत काही दिवसांपासून  वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात लागू असणाऱ्या संचारबंदीला काही दिवस शिथीलतेचा ब्रेक दिल्यानंतर आज(दि-३१) सायंकाळी पाच वाजल्यापासून दोन ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत बारा वाजेपर्यंत जिल्ह्यातील मनपा पाच किमी आणि नप च्या तीन किमी हद्दीत संचारबंदी लागु करण्यात आली असल्याचे आदेश जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज (दि-३१) रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता येणारे दोन दिवस बाजारपेठ आणि भाजीपाला खरेदीसाठी कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

लॉकडाऊन परिस्थितीतुन लोकांना दैनंदिन व्यवहाराची खरेदी करता यावी  यासाठी संचारबंदीला थोडाकाळ ब्रेक लावण्यात आला होता, मात्र खरेदीसाठी बाहेर येणारे लोक वगळता विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक दिसत असल्या कारणाने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत भर पडत आहे. शिवाय नागरिकांना बाजारपेठेत खरेदीसाठी सूट दिली असल्याने लोक मोठी गर्दी करून लॉकडाऊन नियमनांचे पालन  करत नसल्याचे दिसून आल्याने, जिल्ह्यात संचारबंदीत आणखी दोन दिवस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.