प्रणया खोचरे
   जव्हार तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून आजतागायत 101 रुग्णांची नोंद करण्यात आली असून, 54 रुग्णांचे अहवाल यायचे बाकी आहेत, तसेच यातील 45 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची दिलासादायक बातमी आहे.
तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढला, मात्र तितक्याच वेगाने लक्षणे नसलेल्या रुग्णांना काही दिवस आयसोलेशन कक्षात उपचार करून घरी सोडले असून, येत्या दोन तीन दिवसात आणखीन रुग्णांना घरी सोडले जाण्याची चिन्हे आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या दि. 6 जून 2020 च्या अहवालानुसार कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अधिक सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तीसाठी घरी करावयाच्या विलगिकरणाबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळे अहवालानुसार ज्या व्यक्तीकडे सुविधा उपलब्ध आहेत अशा दोन रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आलेले आहे. त्यामुळे योग्य अशी खबरदारी घेण्यात येत असून आणखी रुग्ण वाढता कामा नये याकडे देखील लक्ष दिले जात आहे.