रायगड - अरविंद गुरव
                             
पेण तालुक्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे १६ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने पेणकरांच्या चिंतेत भर पडली आहे. यामध्ये पेण तालुक्यातील बेणसे येथील ५, तांबडशेत येथील १, रोहिदास नगर येथील ५, हनुमान आळी येथील २, सागर सोसायटी येथील २ आणि चिंचपाडा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८६ वर पोहोचली आहे.

त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे, आज तालुक्यातील १२ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. यामध्ये सागर सोसायटीतील ७, वडगांव येथील ४ आणि उत्कर्षनगर येथील १ रुग्णाचा समावेश आहे. आज आढळून आलेल्या १६ पॉझिटीव्ह रुग्णांमुळे पेण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, ४४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत ४१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली.
दरम्यान, पेण तालुक्यातील कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेऊन पेण शहरात २८ जूनपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.

२८ जून नंतर ही पेण तालुक्यातील नागरिकांना सोशल डिस्टनसिंगचे पालन आणि घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करून आपली काळजी आपणच घेण्याचे आवाहन जागृत महाराष्ट्र करीत आहे.