रामदास चव्हाण

मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस सोबत राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेतकरी कामगार पक्ष असे मिळून पाच राजकीय पक्ष एकत्र  असूनही 2014 प्रमाणेच मताधिक्य कायम राहिले. अशी परिस्थिती असून शिवसेना सोडणारयांना दुसरीकडे करमत नाही. फक्त शिवसेना सन्मानाने वागणूक देते. असा सूचक इशारा आमदार भरत गोगावले यांनी पोलादपूर तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याच्या जाहीर कार्यक्रमावेळी दिला.
यावेळी आमदार भरत गोगावले यांच्यासमवेत व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, पुणे येथील हॉटेल व्यवसायिक अनिल गोळे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, अनिल भिलारे, लक्ष्मण मोरे, दशरथ उत्तेकर ,गणपत उतेकर ,शहर प्रमुख सुरेश पवार, अनिल मालुसरे, अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तूर्भे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच वासंती भावेकर यांच्यासह पंचक्रोशीतील अध्यात्मिक क्षेत्रातील बुजुर्ग देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
,,,, पुणे येथील हॉटेल व्यवसायिक तुर्भे येथील सुपुत्र अनिल गोळे यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेशावेळी आमदार भरत गोगावले यांनी हाती भगवा देऊन स्वागत केले.