संतोष औताडे/ नेवासा                             प्रेयसीला भेटाण्यासाठी तो पोहचला उस्मानाबाद वरून थेट पाकिस्तान सीमेवर*  सविस्तर वाचा-  आपल्या प्रेयसीला भेटाण्यासाठी उस्मानाबाद वरून निघालेल्या एका 20 वर्षीय युवकाला पाकिस्तान सीमेवर सुरक्षा जवानांनी पकडले आहे. हा मुलगा अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असुन तो उस्मानाबादचा असल्याची माहिती समोर आली आहे. . तो सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटायला गेला होता. त्यला  पोलिसांनी पकडले. विशेष म्हणजे तो आपल्या प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन गेला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. उस्मानाबाद वरून तो अहमदनगर पर्यंत सायकल वरून पोहोचला त्यानंतर अहमदनगर ते गुजरात मोटारसायकल वरून व नंतर पायी चालत तो थेट पाकिस्तान  मध्ये जाणार होता. त्या पुर्वीच सुरक्षा जवानांनी त्याला अटक केली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत .