लेखक भालचंद्र वनाजी नेमाडे लिखीत "हिंदू जगण्याची समृध्द अडगळ" या कादंबरीत लबाना बंजारा।समाजातील स्त्रियांबदल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे, प्रकाषक हर्ष भटकळ आणि पापुलर प्रकाशन, मुंबई यांच्यावर शासनातर्फे गुन्हा दाखल करून या गंभीर विषयाच्या अनुषंगाने या कादंबरीच्या विक्रीकर निर्बंध आणून प्रस्तूत लेखकाला मिळालेला ज्ञानपिठ पुरस्कार परत घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिमायतनगर तालुका गोर सेना यांच्या तर्फे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी गोर सेनेचे लखन जाधव ,अंकुश जाधव, सुनिल चव्हाण ,प्रमोद बाबू राठोड, अरविंद जाधव, पंडित राठोड, अर्जुन आडे, अंकित राठोड आदी उपस्थित होते.