प्रतिनीधी :-चेतन जांभुळे

रामटेक नागपूर

पशु व दूग्ध विकास क्रीडा मंत्री महोदय नामदार  सूनिल केदार यांनी  नुकतीच सिल्लारी येथे  आढावा बैठकी दरम्यान भेट दिली.  ह्यावेळी  जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे   यांची प्रामुख्याने उपस्थिती होती ..............

प्राप्त माहितीनुसार  एक तक्रार गंभीर स्वरूपाची होती ती अशी की ,
पिढ्या न पिढ्या राहणाऱ्या सिल्लारी गावातील रहिवासी यांच्या तक्रारी नुसार, 
वन परिक्षेत्रात घडत असलेल्या समस्येला सामोरे जावं लागतं आहे.             सिल्लारी
 येथील रहिवासी महिला सीमा गोपीचंद कोडवते  , अरुना  बरेलाल म्हरस्कोल्हे , श्रीमती बेबी राहुल कोकोडे , या महिला जंगलात शौचास जात असताना , पेंच व्याघ्र प्रकल्प येथील महिला वनरक्षक यांनी या महिलांना जातीवादक शिवीगाळ करून जबरन मारहाण केली , या घटनेला सर्वस्वी जबाबदार , वन परिक्षेत्र अधिकारी व त्यांचे वनविभागातील रक्षक यांच्याकडून स्थानिक रहिवासी असलेल्या आदिवासी समाजाचे उत्पिडन केले जात आहे. सर्व गावकरी इथले जन्मतः च रहिवासी आहेत , वन विभागा कडून असे अनेक प्रकारचे अन्याय स्थानिक रहिवासी सहन करीत आहेत.
   प्रति तीन महिने गावातील बेरोजगार व्यक्तीस कामी देऊ असे वन अधिकार्यांकडून सांगितले जातात पण वास्तविक पाहता अस होत नाही , जे जवळचे व्यक्ती आहेत त्यांना महिने न  महिने कामे दिली जातात मात्र जे गरजु व गरीब घरचे व्यक्ती आहेत त्यांना अजिबात कामे दिली जात नाही.
     गावात  डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वन समिती स्थापित करण्यात आलेली आहे , गावकऱ्यांना वाटल की  आम्हाला  चांगले काम मिळणार , गावाच्या विकासाकरिता योग्य ते कामे होणार पण विभागातील काही भ्रष्ट अधिकारी   यांच्यामुळे कामास ग्रहण लागले आहे. 


       आता परिस्थिती अशी आहे की गावातील एकही व्यक्ती वन विभागात हंगामी मजूर किव्वा कोणत्याच प्रकारचे कामे गावकऱ्यांना   नाही आहेत, आणि  वन अधिकारी गावकऱ्यांना  धमकवतात व कामे देत नाही. अशी   तक्रार गावकऱ्यांनी  केली आहे.
 

         सर्व समस्येवर योग्य ते कारवाही करून  गावातील लोकांना सहकार्य करावे  व या पेंच व्याघ्र प्रकल्प सिल्लारी येथील परिसरात   असलेल्या लोकांना कामे मिळावे या दृष्टीने कामे मिळावी  असे निवेदन.
       सिल्लारी येथील रहिवासी सीमा गोपीचंद कोडवते,  अरुणा बरेलाल  म्हरस्कोले , बेबी राहुल कोकोडे, व  सिल्लारी, सालई, पिपरिया, खापा, वाघोली,  येथील समस्त गावकऱ्यांनी गट ग्राम पंचायत पिपरिया चे सरपंच शेखर खंडाते यांचा द्वारे
पशु व दूग्ध विकास क्रीडा मंत्री  नामदार सुनील केदार यांना निवेदन दिले. देवलापार पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे  यांना महिला वनरक्षकावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी तक्रार  दाखल केली. गावकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
      नामदार सुनील केदार यांनी सिल्लारी गावात भेट दिली असता ह्यावेळी जिल्हा परिषद सदस्य शांता कुंभरे,  पंचायत समिती सभापती कला ठाकरे, रवींद्र कुंभरे, सूर्यभान ईडपाची, यांची उपस्थिती होती.

           जिल्हा परिषद सदस्य शांता कुंभरे यांच्याशी भ्रमण ध्वनी द्वारे विचारणा केली असता त्या म्हणाल्या की "  महिला वन कर्मचाऱ्यांनी  जर त्या स्थानिक  महिलांना  समजावून सांगितले असते तर हा प्रकार घडला नसता. वाद विकोपाला गेला नसता. स्थानिकांच्या व्यथा वन अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे, एकदमच असे  उग्र विचार व हात उगारणे  अशी वागणूक वन अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना शोभा देत नाही असे मत व्यक्त केले....,.......

         देवलापार चे पोलीस निरीक्षक  प्रवीण बोरकुटे यांना घडलेल्या प्रकारना विषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की " सिल्लारी गावातील महिला जंगलामध्ये गेल्या असता   महिला वनरक्षक व स्थानिक महिला यांच्यामध्ये वाद झाला  व महीलांची हातापाई  झाली व तो वााद विकोपाला गेला ,दोन्ही पक्षांनी  एकमेकाविषयी तक्रार दाखल केली आहे व तक्रारीची चौकशी करणे सुरू आहे असे  मत व्यक्त केले.