धुळे जिल्ह्यातील नेर गावाचे माजी सैनिक सय्यद निसार कासम उर्फ दादा यांचे वयाच्या ६७ या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, सन 1971 साली भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात झालेल्या युद्धात दादांचा सहभाग होता, दादा हे सिग्नल रेजिमेंट मध्ये होते. युद्धात जेव्हा आपल्या भारत देशाचा विजय झाला तेव्हा दादांना "ज्युनियर कमिशनर ऑफिसर" अर्थात "सुबेदार" हे पद बहाल करण्यात आले होते, सय्यद दादा यांनी २४ वर्ष देश सेवा केली, तसेच सय्यद दादा यांनी भारतीय सैन्यात राहून खूप नाव कमवले, दादा हे नेर गावासाठी एक अभिमानकारक व्यक्तिमत्व होते,
सय्यद दादा यांना नेर गावातील सर्व लोकांकडून व आजी माजी सैनिक क्लब कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.