रत्नदीप शेजावळे
जिंतूर (०१/०८)


दहावीच्या परीक्षेत विशेष गुण प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिंतूर येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे रमाई विचार मंचाच्या वतीने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्ताने गुणवंत विध्यार्थी सत्कार समारंभ आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आयोजीत करण्यात आला होता.

यामध्ये साक्षी माधव निकाळजे (94.40%) तेजस्विनी राजू वाकले(94%) उन्नती सुधाकर खंदारे(90%) प्रेरणा पंडीत उघडे(75.40) या विध्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी  अध्यक्षस्थानी राजू वाकळे सर ,प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथक प्रमुख संगीता वाघमारे, ऍड. माधव निकाळजे,नामदेव प्रधान,प्रमोद डबडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजक तथा रमाई विचार मंचच्या अध्यक्षा आशाताई खिल्लारे यांनी प्रस्तावना केली, तर डॉ.श्रद्धा खिल्लारे यांनी सूत्रसंचालन केले,आभार प्रदर्शन रजनी खिल्लारे यांनी केले. यावेळी शेवंता प्रधान,विमल प्रधान,मेघा मोरे,दीपाली वाकळे, कमल खिल्लारे सुनीता पाटील,प्रीती लांडगे व रमाई विचार मंचाच्या सर्व सदस्यांसह पालकांची उपस्थिती होती.