सुभाष पगारे

मनसे सरचिटणीस नयन कदम यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
    मनसे सरचिटणीस नयनजी कदम हे कोरोनाग्रस्त रुग्णांना जास्त बिल चार्ज करून लुटणाऱ्या खाजगी रुग्णालयांच्या विरुध्द सतत लढत होते व कोरोनाग्रस्त रुग्णांचे बिल कमी अथवा माफ करून देत होते. त्यावेळी त्यांनी जराही असा विचार केला नाही की आपण ज्याठिकाणी जात आहोत ते हॉस्पिटल संपूर्ण कोरोनाग्रस्त रुग्णांनी भरलेलं आहे आणि आपल्यालाही याची लागण होऊ शकते. परंतु कोरोनाग्रस्त रुग्णांची होणारी लूट त्यांना सहन होत नव्हती. कोरोनाग्रस्त रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी ते स्वतः रुग्णालयात जाऊन रुग्णालयांच्या मालकांशी चर्चा करून कोरोनाग्रस्त रुग्णांचे बिल कमी अथवा माफ करून घ्यायचे. हे कार्य करत असतांना आज ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.