;कोरोनाच्या भीती मुळे गेले जवळपास दहा महिने सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा बंद होती. अत्यावश्यक सेवा देणारे आणि महिलांसाठी लोकल सुरु झाल्या असल्या तरी सरसकट सर्वांसाठी मात्र लोकल प्रवास अजूनही प्रतिबंधित आहे. त्यातच आज पनवेल हून ठाण्याकडे येणाऱ्या ट्रान्स हार्बर वरच्या लोकल डब्यात एक अत्यंत निंदनीय प्रकार आढळून आला. पनवेल हून दुपारी निघालेल्या स्लो लोकलच्या प्रथम वर्गातील सीट वर "लडकी मिलेगी" असा मजकूर लिहिलेला आढळल्याने खळबळ उडाली. हे लिहिणाऱ्या समाजकंटकाने सदर मजकूरखालीच एक मोबाईल नंबर देखील लिहून ठेवला होता. सदरचा प्रकार हा एखाद्या महिलेची बदनामी करण्यासाठी केला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी cctv च्या मदतीने ha मजकूर लिहिणाऱ्या समाजकंटकाचा शोध घेण्यास सुरुवात केली असून कोणीही अशा प्रकार रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान करू नये असे आवाहन रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.