उपोषणाची सुरुवात शैक्षणिक चळवळगीतांनी झाली असून मानसिक तणाव , उपासमारी,आर्थिक मंदी, बेरोजगारी, भूकबळी व लॉकडाऊन अश्या (कागदावर लिहिलेले शब्दांनि भरलेली गोन फेकून ) अनेक अडचणींखाली दडलेल्या  एका विद्यार्थ्याला दिलासा देत लढा जिंकण्यासाठीची उमेद देऊन मंजिरी ताईंनी व  मराठी भारती संघटनेच्या कार्याध्यक्षा विजेता ताई भोनकर व छात्रशक्ती संस्थेच्या सेक्रेटरी स्मिता ताई साळुंखे तसेच मैत्रकूल जीवन विकास केंद्राचे प्रमुख संचालक आशिष गायकवाड अश्या उपस्थित मान्यवरांचे भाषण झाले. व त्यानंतर मंजिरी ताईंना मान्यवरांच्या हस्ते  पाणी पाजून उपोषणाची सुरुवात मंजिरी ताईंच्या जोरदार भाषणाने झाली. 

लाखो मुलांचे प्राण वाचवण्यासाठी माझे प्राण गेले तरी बेहत्तर - मंजिरी धुरी.
काकड आरतीच्या माध्यमातून जागो प्रधानमंत्रीचा जागर विद्यार्थी भारती देशभर करणार .

लाखो ट्विट्स , इमेल पाठवून पण भारताचे माननीय प्रधानमंत्री त्या कडे बघायला तयार नाहीत याचा अर्थ त्यांनाही भारतीय विद्यार्थ्याचे झेनोसाईड करायचे आहे काय असा रोखठोक सवाल विद्यार्थी भारतीय राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरि धुरी यांनी पदवी व पदव्युत्तर परीक्षेच्या सक्तीच्या विरोधात पुन्हा एकदा आमरण उपोषणाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी केले व त्या पुढे म्हणाल्याकी लाखो विद्यार्थ्याचे प्राण वाचवण्यासाठी माझे प्राण गेले तरी बेहत्तर पण जो पर्यंत पदवी व पदव्युत्तर परीक्षा या महामारीचा व मुलांच्या परीक्षेचा विचार करून ऐच्छिक होत नाहीत तो पर्यंत मी उपोषण सोडणार नाही व प्रधानमंत्रि मोदी यांनी तात्काळ घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढावा व विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तुलना बियर बार सोबत करणाऱ्या भूषण पटवर्धन यांची तात्काळ हकालपट्टी करावी असे धुरी म्हणाल्या.