संतोष औताडे/ नेवासा.                  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिस गाडीला अपघात

सविस्तर वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असतांना या ताफ्यातील पोलीस पायलट मोटार गाडी क्रंमांक MH-12 NU-5881 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ उलटली. यामध्ये एकाला किरकोळ मार लागलाय.. शरद पवार यांची गाडी पुढे होती .

पाठीमागील ताफ्यातील पोलिस  गाडी उलटल्याचे लक्षात आल्यानंतर शरद पवार यांनी गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली. उपचारासाठी त्यांना हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यानंतर शरद पवार मुंबई च्या दिशेने रवाना झाले.