कोरोना महामारीच्या काळात 17 व्या लोकसभेचे चौथे अधिवेशन सुरू झाले. परंतु, कोरोनामुळे यात बरेच बदल दिसून आले आहेत. संसद परिसरात प्रवेश पासून ते सभागृहाच्या कामकाजात सुद्धा कोरोनाचा प्रभाव दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि खासदारांसह सर्वांच्या चेहऱ्यावर मास्क दिसून आले.

शिवसेना खासदारासह 17 सदस्यांना कोरोना

संसदेच्या प्रवेश द्वारावर तापमान चेक करण्यात आले. यानंतर सर्वांचे कोरोना अहवाल पाहण्यात आले. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवेश देण्यात आला. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जवळपास 4000 लोकांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. यामध्ये खासदार, त्यांचे स्टाफ आणि संसदेतील कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये 17 खासदारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे आणि प्रवेश साहिब सिंग यांच्यासह 12 भाजप खासदार आहेत. त्यात वायएसआर काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेच्या एका खासदारासह द्रमुक आणि आरएलपीच्या प्रत्येकी एका-एका सदस्याचा समावेश आहे.

हे बदल दिसून आले

  • लोकसभेत केवळ 200 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 30 खासदार गॅलरीत बसले होते. लोकसभेतच मोठा स्क्रीन लावण्यात आला होता. याच्या माध्यमातून राज्यसभेत बसलेल्या लोकसभा सदस्यांना पाहता आले. उर्वरीत सदस्य राज्यसभेत बसले होते. अशाच प्रकारची व्यवस्था राज्यसभेत सुद्धा करण्यात आली होती. जेणेकरून लोकसभेतील कामकाज पाहता येईल.
  • पहिल्यांदाच लोकसभेत प्रश्नकाल झाला नाही. विरोधी पक्षाने यासंदर्भात गदारोळ निर्माण केला. हा निर्णय लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले.
  • लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी खासदारांना आपल्या आसनावरच बसून बोलण्याची परवानगी दिली. चार तासांच्या कामकाजात सर्वांनी बसूनच प्रश्न केले.
  • सर्वच खासदार मास्क आणि हातमोजे घालून होते. सर्वांनी एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंगनुसार दूर राहण्याचा नियम पाळला.