शिवसरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष जयश्री शुक्ला यांनी संजय लगड यांचे समाजप्रबोधनाचे कार्य बघून त्यांची औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. निवड झाल्या बद्दल औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. कानिफनाथ सावंत, राजेंद्र शेंडगे, दिलीप लगड, गुरुप्रसाद लगड, विठ्ठल लगड, गजानन जाधव, नामदेव शेडगे, बाळासाहेब नाझरकर, सतीश ढोणे, इम्रान पठाण आदींनी संजय लगड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.