संतोष औताडे/ नेवासा.                               *शेवगावात कोरोनाने घातला सरकारी कार्यालयांना विळखा*

*सर्वसामान्य नागरिकांबरोबर सरकारी बाबु ही कोरोनाच्या कचाट्यात*

  सविस्तर वाचा- शेवगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने घट्ट विळखा घातला असुन शेवगाव पंचायत समितीसह तहसिल कार्यालय आणि नगरपरिषद कार्यालयातील अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाल्यामुळे सरकारी काम ठप्प झाली आहेत, त्यात कार्यालयातील कमी झालेली कर्मचारी संख्या शेवगावकरांची चिंता वाढवणारी आहे.
      सुरवातीला पंचायत समितीचे बीडीओ मग गटशिक्षणाधिकारी,  तहसील कार्यलयाच्या आस्थपणा विभागातील चार ते पाच कर्मचारी आणि दोन दिवसापूर्वी नागरपरिषदच्या वसुली विभागातील कार्यलयीन कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने सर्वसामान्यांची संबधीत कार्यालयातील संख्या रोडावली आहे, कोव्हीड सेन्टरमध्ये अँटीजेन टेस्टचे संपलेले किटस, बेड्स ची कमी, स्वॅप टेस्ट दिल्यानंतर रिपोर्ट्सना होणारा उशीर अश्या समस्या चिंताजनक आहे, त्यातच शहरात आणि तालुकयात मोकाट फिरणारे पेशंट यामुळे शेवगावकरांचा जीव टांगणीला लागलेला आहे, काही महाभाग तर अमृत पिऊन आल्यासारखे विनामास्क शहरात पिचकाऱ्या मारत फिरत आहेत, पालिका, पोलीस आणि महसूल विभागाने यावर दंडात्मक कारवाई करायला हवी पण त्यांच्याकडे कर्मचारी थोडे अपुरे पडत असल्याचे चित्र दिसत आहे.