कोविड परिस्थितीमुळे फटका बसलेल्या ग्रामीण भागातील शेतीपूरक उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या सहकारी कुक्कुटपालन संस्थांकडून थकबाकीबाबत वन टाइम सेटलमेंट म्हणजेच एकमुस्त करार करून त्यांना दिलासा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकार कडून घेण्यात आला. यामुळे ग्रामीण कुक्कुटपालनाला प्रोत्साहन व अंडी उत्पादनास चालना मिळेल. या निर्णयामुळे व्याज व दंडव्याजापोटी ३६५१ लाख रुपये रक्कम माफ करण्यात येईल. या एकमुस्त करारात सहभागी होण्यासाठी संस्थांना १ महिन्याचा कालावधी देण्यात येईल.