संतोष औताडे/ नेवासा                         *साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी मनसे चे शिडीऀ येथे आक्रमक आंदोलन* सविस्तर वाचा- शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी , शिर्डी येथे मनसेने आक्रमक आंदोलन केले.  कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाउन लागू झाला . त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील मंदिर अद्यापही बंद आहे . केंद्राने सुचना दिल्यानंतरही राज्यातील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे  . शिर्डीचे साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करा , संस्थान कर्मचार्यांचा वेतन कपातीचा निर्णय मागे घ्या , या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने शिर्डीत आंदोलन करण्यात आले . मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे . बाळा नांदगावकर यांनी साईबाबांना साष्टांग दंडवत घातले आणि मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले व्हावे आणि संस्थान कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय मागे घ्यावा , असं साकडं साईबाबांना घातलं . साई मंदिर खुले करा अन्यथा आम्ही स्वतः खुले करून मंदिरात प्रवेश करू , असा इशारा मनसेनं दिला होता . त्यामुळे साई मंदिराच्या परिसरात पोलीस प्रशासन आणि संस्थानची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती . सकाळ पासूनच शिर्डीच्या साईमंदिराला सुरक्षा वाढवण्यात आली होती .काही दिवसांपूर्वी अनलॉक 4.0 मध्ये ठाकरे सरकारनं काही सवलती देत हॉटेल्स आणि मॉल खुली करण्याची परवानगी दिली . मात्र , अद्याप मंदिरांना परवानगी देण्यात आलेली नाही . यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची कानउघडणी केली होती.या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.