प्रणया खोचरे

    जगभर पसरलेल्या कोरोनाच्या महामारी मुळे बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अनेक नियमांत बदल केले आहे, १ जुलै पासून एटीएम मधून पैसे काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही, पूर्वी प्रमाणे त्यावर चार्ज लावण्यात येतील असा नियम बँकांनी काढला आहे  त्यामुळे ग्राहकांना बँकांच्या बदललेल्या नियमांबद्दल जाणून घ्यायला हवं, अन्यथा त्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागू शकतो.यामध्ये एटीएम मधून कॅश काढण्यासाठी कमीत कमी बॅलन्स असणाऱ्या सुविधांमध्ये बदल होणार आहेत. 
  कोरोनाच्या संकटामुळे कित्येक जण घरी बसले होते, लॉक डाऊन मध्ये अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या जातील याचे संकट होते, कोणत्याच प्रकारची देवाण घेवाण सुद्धा नव्हती, त्यामुळे अर्थ मंत्रालयाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी एटीएम मधून पैसे काढण्यावरील सर्व प्रकारचे चार्ज हटवून बँकांनी सांगितलेल्या नियमानुसार ही सूट ३० जून रोजी संपुष्टात येणार असून,१ जुलै पासून जर तुमच्या बचत खात्यात रक्कम नसेल तर त्यावर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो, त्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या खात्यात कमीत कमी रक्कम असणे आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया व कोटक महिंद्रा बँकेनेही बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.