https://twitter.com/RahulGandhi/status/1305706617539760128

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनदरम्यान प्रवासी मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या संख्येची नोंद आपल्याकडे नसल्याचं सरकारनं म्हटलं होतं. यावरून राहुल गांधींनी केंद्रावर हल्लाबोल केला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडे लॉकडाउनमध्ये प्रवासी मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या संख्येची नोंद नसल्याचं लेखी उत्तराद्वारे सांगितलं होतं. “लॉकडाउनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आणि किती जणांची नोकरी गेली याची माहिती मोदी सरकारला नाही. तुम्ही मोजलं नाही म्हणून मजुरांचे मृत्यू झाले नाही का? परंतु सरकारवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांचं मरण सर्वांनी पाहिलं. परंतु एक मोदी सरकार ज्यांना त्याची माहितीही मिळाली नाही,” असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीं यांची प्रकृती ठिक नसल्यानं त्या उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधी हेदेखील परदेशात गेले आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत आपापल्या राज्यांमध्ये किती प्रवासी मजुर गेले असा सवाल सरकारला करण्यात आला होता. तसंच या कालावधीत किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला होता आणि त्याची नोंद सरकारकडे आहे का ? असंही विरोधकांकडून विचारण्यात आलं होतं. यावर केंद्रीय श्रममंत्री संतोष कुमार गंगवार यांनी सरकारकडे अशी नोंद नसल्याची नसल्याचं लेखी उत्तराद्वारे सांगितलं.

Best Sellers in Shoes & Handbags