नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील एका शेतमालकाच्या 5 वर्षीय चिमुकलीवर सालगडी बाबू खंडू सांगेराव याने अत्याचार करून तिचा खून केला, तसेच चिमुकलीचे प्रेत सुधा नदीपात्रात फेकून दिले. हि घटना काल उघडकीस आली आहे, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, त्या नराधमास तात्काळ फासावर चढवून बालिकेला न्याय द्यावा. अशी मागणी सर्व समाजबांधवातर्फे केली जात आहे, या मागणीसाठी भोकर शहरात कडकडीत बंद करून मोठ्या प्रमाणात महिला व सर्व समाज बांधवांनी रस्त्यावर उतरूण निषेध केला, चिमुकलीला न्याय मिळावा या मागणीसाठी सर्व समाज बांधव आक्रोश दाखवत आहे.

         याप्रकरणी चिमुकलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला असून, त्यातील मुख्य आरोपीस आणि त्याच्यासोबाबत असलेल्यांना तात्काळ अटक करावे आणि हे प्रकरण महाराष्ट्र शासन तयार करत असलेल्या महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल कायदा 2020 अंतर्गत स्वतंत्र न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात अनेक समाजबांधव उपस्थित होते.